Copyright © 2014 manatale gupit . Powered by Blogger.

Monday, 27 January 2014

परीपुर्णत्त्वाकडे झुकताना

क्षणभरी वेड्या मानवा थांब जर,
नसलेल्या अस्तित्त्वातून डोकावाशील का ?
हे मानवा….
ह्या जगरहाठीचापासून दूर का जायचंय तुला?
हे वेड्या मानवा, तू जाणारच आहेस ना!
कपाळावरच्या दोन भाग्याच्या रेशांमधली
"मी" पणाचा अहंकार तुला दिसला का?
हे मानवा तुला सर्व काही सुखं मिळतील
ऐश्वर्य, सुखचैन, प्रारब्ध,
पण…….
कधी स्वतःचे गुण, प्रामाणिकपणा, स्वार्थीपणा
दिसला आहे का?
हे मानवा तू जाणार आहेस ना जा……
पण क्षणभर थांब……
मनाशी थोडा विचार कर
हे मानवा जायच्या वेळीच तुला
तुझ्या नीतीमुल्यांसाठी झगडावं लागणारच….
तेव्हा पश्चातापात तू होरापोळून निघशील
त्या तुझ्या "मी" पणाचे अस्तिव जाळून निघेल
हे मानवा, तेव्हा तुला ह्या सर्वांतून निभावून जायला हवं
फक्त तुलाच नाही, सर्व प्राणीमात्रांना जायचंच आहे!
हे मानवा, शेवटी परीपुर्णत्त्वाकडे झुकताना,
तरी तुला विनम्र बनायलाच हवं!!
विनम्र बनायलाच हवं!!!!

Saturday, 25 January 2014

आशेचा किरण...!!!

शब्दांनाही नाही कळले
शब्दांचा पलिकडले
शब्दही अपुरे पडले
शब्दातून व्यक्त होताना 
गळून गेले शब्द
लेखणीचा भार  सांभाळताना
अशाच अधुऱ्या राहिल्या त्या भावना….

ना उमगल्या त्या कोणांस
ना जाणिल्या कोणी त्यांस
मग व्यक्त होणार तरी त्या कश्या…?

भावनांचा हा कल्लोळ
अस्वस्थ करून जाई मन
का कोणास ठावूक ,
पण घाबरून जाई  मन
वेडे मन विचार करी……
"कधी संपणार हा भावनांचा खेळ?"
भलताच मांडला आहे हा खेळ
वाटे बोलावे जाऊन सरळ
पण बोलणे काय सारेच तर आहे व्यर्थ
मात्र तरी असे मनी एक आशेचा किरण
केंव्हा तरी गवसेल तो "आशेचा किरण"!